Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
बेलापूर न्यायालयात 12 डिसेंबरला पहिली ऑनलाईन लोक आदालत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/ADALT.jpg)
नवी मुंबई -नवी मुंबईच्या सीबीडी बेलापूर येथील न्यायालयात येत्या 12 डिसेंबरला पहिली ऑनलाईन लोक आदालत आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आता सोशल मीडियावरून या लोक आदालतमध्ये भाग घेता येणार आहे.
गावातील वाद आणि तंटे मिटवण्यात मह्त्वाचे काम लोक आदालतीत होते. यामुळे न्यायालयातील खटल्यांची संख्या कमी होण्यास आणि कोर्टावरील खटल्यांचा ताण कमी होण्यास मदत होते. अशी ही महत्वाची लोक आदालत आता हायटेक झाली आहे.
त्यात राज्यातील पहिली लोक आदालत नवी मुंबईतील बेलापूर न्यायालयात ऑनलाईन आयोजित केली आहे. त्यात वादी-प्रतिवादींना व्हॉट्सअपनेही सहभागी होता येणार आहे. यामुळे दावे वेगाने निकाली काढण्यासही चांगली मदत होणार आहे.