फिल्मसिटी काढायला निघालेल्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/4neelam_gorhe_40mlc.jpg)
मुंबई । “फिल्मसिटी काढायला निघालेल्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत”, असे म्हणत राज्यात विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. “उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी काढायला निघाले आहेत. त्या राज्यात जिथे महिलाच सुरक्षित नाहीत. खरंतर अशा ठिकाणी साक्षीदार संरक्षण कायदा आणि संबंधित मुलींना संरक्षण देणे अशा आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होणे अतिशय गरजेचे आहे”, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
“माननीय राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्याकडे ‘उत्तर प्रदेश सरकारने दाखवलेला बेजबाबदारपणा आणि अतिशय अयोग्य वर्तन’ या विषयाकडे लक्ष वेधणारे निवेदनाचे पत्र दिलेले आहे. त्यासोबत गुन्हेगारांना एक महिन्याच्या आत फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली. हाथरसच्या घटनेमधून पुन्हा एकदा महिला सुरक्षेसंदर्भात उतर प्रदेशातील भीषण स्थिती समोर आली आहे”, असे म्हणत नीलम गोऱ्हे यांनी चिंता व्यक्त केली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Nilam-Gorhe-biography.jpg)
नीलम गोऱ्हे त्यापुढे असेही म्हणाल्या की, “मला असं वाटतं की फार मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेश सरकारमध्ये जे लोक या स्थितीला जबाबदार आहेत त्या सर्वांची चौकशी व्हावी. त्याचप्रमाणे, त्यांच्यावर कारवाई होणे देखील आवश्यक आहे.”