Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
प्रसिध्द गायिका कनिका कपूरविरोधात गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/1584760253.jpg)
मुंबई – कोरोना विषाणूची लागण झालेल्या प्रसिध्द गायिका कनिका कपूरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निष्काळजीपणा केल्यामुळे शुक्रवारी रात्री लखनऊच्या सरोजिनी नगर पोलिस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्याबाबची माहिती स्वत: कनिकाने शुक्रवारी दुपारी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दिली होती.
लखनऊचे पोलिस आयुक्त सुजित पांडे यांनी सांगितले की, ‘धोकादायक आजार पसरवल्याच्या आरोपाखाली कनिकाविरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम २६९, २७० आणि १८८ अन्वये कनिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’ लखनऊचे मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे देखील पांडे यांनी सांगितले.