breaking-newsमुंबई

पालघरमध्ये शुक्रवारपासून ५ दिवसांचा कडक लॉकडाऊन

पालघर – कोरोनाचा होणार फैलाव रोखण्यासाठी पालघर शहरात येत्या १४ तारखेपासून ते १८ तारखेपर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील किराणा मालासह सर्व दुकाने आणि भाजीपाला बाजार बंद राहणार आहेत. या लॉकडाऊनमधून औषधांची दुकाने, रुग्णालये आणि अत्यावश्क सेवा यांना वगळण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

पालघर शहर आणि परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी शुक्रवारपासून शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. या लॉकडाऊनमुळे शहरातील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. या लॉकडाऊनमधून अत्यावश्यक सेवा, औषधांची दुकाने, दूध डेअरी यांना वगळले आहे. पेट्रोल पंपावरही केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनानांच इंधन देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या लॉकडाऊनमध्ये शहरातील बँकाही सुरू राहणार आहेत. पण त्या टोकन पद्धतीने व्यवहार करतील, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button