breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
पत्री पूल जानेवारीत होणार खुला
कल्याण – कल्याण पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगसाठी रविवारी दुपारी वेळ अपुरी पडल्याने १० टक्के काम अपूर्ण होते. या कामाच्या पूर्ततेसाठी मध्यरात्री रेल्वेने विशेष मेगाब्लॉक घेऊन हे काम साेमवारी पहाटे ६ वाजता पूर्ण करण्यात आले आहे. ७०० टन वजनाच्या गर्डर लाँचिंगची मोहीम अखेर फत्ते झाली आहे. पत्रीपुलाची अन्य कामे डिसेंबर अखेपर्यंत पूर्ण करून जानेवारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल,असे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले