पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मनात आहे काय?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/8-2.jpg)
मुंबई |महाईन्यूज|
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच ‘सामना’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट बुलेट ट्रेन याविषयी भाष्य केले आहे. पंतप्रधानांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प राज्य सरकार गुंडाळणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे.
त्यानंतर ‘बुलेट ट्रेनचं काय?,’ असा उलट प्रश्न संजय राऊत यांनी केला, त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “बुलेट ट्रेनबद्दलसुद्धा मला असं वाटतं. याच्यावरती सगळ्यांच्या सोबत बसून विचार व्हायला पाहिजे. हुलेट ट्रेनचा उपयोग कोणाला होणार आहे, त्याच्यामुळे इथे किती उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे आणि तो जर उपयोगाचा असेल… तर पटवून द्या. आपण जनतेसमोर जाऊ. मग पाहू काय करायचे ते,” असं उत्तर यावर ठाकरेंनी दिले. संजय राऊत यांनी ‘पण ते तर पंतप्रधानांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे’, असं असं ठाकरे यांना सांगितलं. त्यावर “असेल. बरोबर आहे, पण हे ड्रीम प्रोजेक्ट जरी असलं तरी जेव्हा जाग येते तेव्हा वस्तुस्थिती समोर असते. स्वप्न नसतं,” अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेनच्या मुद्द्यावर मांडली आहे.