breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

धक्कादायक! लासलगाव जळीतकांडातील पीडितेचा अखेर मृत्यू

मुंबई | महाईन्यूज

लासलगाव जळीतकांडातील पीडितेचा अखेर मृत्यू झाला. सहा दिवसांपासून ती मृत्यूशी झुंज देत होती. मुंबईच्या मसिना रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. अंगावर पेट्रोल टाकून काडी पेटविताना झालेल्या झटापटीत ही पीडिता गंभीररीत्या भाजलेली होती. मुंबईतील मसिना रुग्णालयात शुक्रवारी रात्री एक वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह अंत्य संस्कारासाठी लासलगावला नेला जाणार आहे.

लासलगाव येथील बस स्थानकावर १५ फेब्रुवारी झालेल्या वादानंतर ही महिला भाजली होती. याप्रकरणातील मुख्य आरोपी रामेश्वर भागवत, पेट्रोलपंप व्यवस्थापक व कर्मचारी आकाश शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील प्रमुख आरोपी रामेश्वर भागवतला निफाड न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर, आकाश शिंदेला १५ हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. तर पेट्रोलपंप व्यवस्थापकास अद्यापही अटक केलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button