देशातील सरकारी कामगारांच्या देशव्यापी बंदला शिवसेनेचा पाठिंबा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/workers.jpg)
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
कामगार संघटनांच्या ‘भारत बंद’च्या आवाहनास शिवसेनेने बुधवारी पाठिंबा दर्शविला आहे. तसेच, आणि केंद्र सरकारच्या धोरणांचा आणि कामगार विरोधी निर्णयांचा शिवसेनेने विरोध केला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रात म्हटले आहे की, “भाजपा सरकारच्या पहिल्या कारकिर्दीत नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) यासारख्या निर्णयामुळे उद्योग आणि कामगारवर्गावर विपरित परिणाम झाला आहे.”
“भाजपा सरकारच्या कामगार विरोधी धोरणांविरोधात” निषेध करण्यासाठी वेगवेगळ्या महासंघांसह सर्व दहा केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’मुळे अनेक ठिकाणी वाहतूक आणि बँकिंग सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.
सिटू, आयएनटीयूसी यांच्यासह दहा केंद्रीय कामगार संघटनांनी १२ कलमी मागणीच्या सनदीसह संप पुकारला आहे. कामगार संघटना भारतीय मजदूर संघ (बीएमएस) संपात भाग घेणार नाही. तसेच, ‘सामना’तील अग्रलेखात म्हटले आहे की, लोकांच्या बाबतीत सुधारणा होईल अशी अपेक्षा होती, परंतु “सध्याचे सरकार स्थापन होऊन सहा महिने झाले आणि ना उद्योग आणि ना मजुरांची स्थिती सुधारली.