देव सर्वांचा आहे, देव दर्शनात राजकारण नको : उद्धव ठाकरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Udhav-Thakarey-1.jpg)
मुंबई | ‘देव सर्वांचा आहे त्यामुळे देव दर्शनात कोणतेही राजकारण आणू नका. देवाचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. ज्याला कोणाला अयोध्येला यायचे आहे त्यांनी यावे, असे मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. ७ मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहे यावर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
सरकारला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची मुंबईत पत्रकार परिषद झाली. यावेळी सामनाच्या संपादक पदाची जबाबदारी रश्मी ठाकरे यांच्याकडे दिल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी असे सांगितले की, ‘शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाची दिशा आणि भाषा बदलणार नाही. सामनाची भाषा ही आमची पितृभाषा आहे.
रश्मी ठाकरे या जरी सामनाच्या संपादक झाल्या असल्या तरी सामना संपादकीय विभागाची जबाबदारी संजय राऊत यांच्याकडेच राहणार आहे.’