breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

तळोजा एमआयडीसीत वायू गळती; अमोनिया वायूचे ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम

पनवेल |महाईन्यूज|

पनवेलच्या तळोजा एमआयडीसीमध्ये फोरस्टार फ्रोझन फूड्स कंपनीमध्ये शनिवारी वायू गळती झाल्याची घटना घडली आहे. या वायु गळती झाल्याने कंपनीच्या परिसरातील ग्रामस्थांना या अमोनिया वायूचे साईड इफेक्ट जाणवू लागले आहे.

तळोजा परिसरातील ग्रामस्थांना चक्कर येणे, पोटात मळमळणे तसेच उलट्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे काही तास या परिसरात घबराट पसरली होती. ही वायू गळती झाल्यानंतर खुद्द स्थानिक ग्रामस्थांनी कंपनीत धाव घेतली. ज्या पाईप वॉलमधून वायू गळती होत, तो वॉल बंद करून वायू गळती बंद केल्याचे काही प्रत्यक्षदर्शीने यावेळी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button