breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

डोंबिवलीत मुख्य पाईपलाईन फुटली, कल्याण- शीळ महामार्गावर पाणीच पाणी

डोंबिवली – डोंबिवलीच्या पलावा जंक्शनजवळ शुक्रवारी रात्री एमआयडीसीची मुख्य पाईपलाईन फुटली आणि लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे कल्याण-शीळ महामार्गाला अक्षरशः नदीचे स्वरूप आले होते. बदलापूरच्या बारवी धरणातून ठाणे महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणारी ही जलवाहिनी पलावा जंक्शन ते खिडकाळी परिसरात दरम्यान रात्री साडेदहा वाजता फुटली.

अचानक जलवाहिनी फुटून तिचे पाणी प्रचंड वेगाने रस्त्यावर आल्याने रस्त्याची एक बाजू रात्री उशिरापर्यंत बंद होती. त्यामुळे या रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान जलवाहिनी फुटल्यामुळे आज शनिवारी दिवसभर डोंबिवली एमआयडीसी फेज एक, फेज दोन, एमआयडीसी निवासी विभाग, डोंबिवलीतील ग्रामपंचायती, तसेच केडीएमसी क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा बंद होता.

या पाइपलाइनद्वारे दिवा, मुंब्रा, कळवा या ठिकाणी पाणी पुरवठा होत होता. या पाइपलाइनच्या दुरुस्तीसाठी नेमका किती वेळ लागेल हे अधिकृतरित्या अद्याप एमआयडीसीकडून सांगण्यात आलेले नाही. तोवर या ठिकाणचा पाणी पुरवठा बंद असणार आहे. तसेच दुरुस्तीच्या कामामुळे डोंबिवली एमआयडीसी विभाग आणि फेज एक व दोन तसेच काही ग्रामपंचायती या ठिकाणचा पाणी पुरवठा बंद असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button