डिअर एनसीबी, कंगनाला कधी बोलवणार? – सचिन सावंत
![Actress Kangana Ranaut's troubles escalate over controversial statement regarding Sikhs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/kangna.png)
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध महाविकास आघाडी हा वाद अजूनही शमन्याची चिन्ह दिसत नाहीत. कारण काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी कंगनाचा ड्रग्सबाबत एक जुना व्हिडीओ ट्वीट करून तिला एनसीबी चौकशीसाठी कधी बोलवणार असा प्रश्न विचारला आहे.
वाचा :-“बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ” – उर्मिला मातोंडकर
सचिन सावंत यांनी ड्रग्सच्या आहारी गेल्याची कबूली देतानाचा कंगनाचा व्हिडीओ ट्वीट करून म्हटलंय, ‘डिअर एनसीबी, ती परत आलीये. या व्हिडीओच्या चौकशीसाठी तुम्ही कंगनाला कधी चौकशीसाठी बोलवणार आहात? कंगनाला बॉलिवूडमधील ड्रग्स रॅकेटची माहिती द्यायची असल्याने मोदी सरकारने तिला वाय श्रेणीची सुरक्षा दिली आहे. मात्र ती अजूनही माहिती लपवत आहे, जो की गुन्हा आहे’, असे सावंत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर कंगनाने राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले होते. एवढंच नाही तर कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही तिने सवाल केले होते.