अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे कंगणा मुंबई परत येऊन मुंबा देवी आणि सिद्धविनायक मंदिराला मराठमोळ्या वेशात दर्शन घेतले. मुंबईबद्दल तीने एक पोस्ट लिहीली आहे. एरवी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगणाने मुंबईबद्दल प्रेम व्यक्त केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. विशेषतः काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत आलेल्या अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी यावरून कंगनाला चांगलंच लक्ष्य केलं आहे.
चित्रपटांपेक्षा वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारी बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रणौत मुंबईत परतली. ती मुंबा देवी आणि सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेली. यावेळी हिरव्या रंगाची साडी आणि नाकात नथ अशा मराठमोळ्या रूपात ती दिसली. “माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभे राहिल्यामुळे मला किती शत्रूंचा सामना करावा लागला. मी आज मुंबा देवी आणि श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. मला खूप प्रेम मिळालं. आता मला सुरक्षित वाटतं आहे”, असं ट्विट कंगनानं केलं आहे
माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभे राहिल्यामुळे कंगनाचं हेच वाक्य पकडून उर्मिला यांनी कंगनाला टोला लगावला आहे. “माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभं राहिल्याबद्दल. बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ, असं खोचक ट्वीट उर्मिला यांनी केलं आहे.