ठाकरे सरकारचा कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांची फसवणूक करणारा : चंद्रकांत पाटील
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/patil.jpg)
मुंबई | महाईन्यूज
महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंतची कर्जमाफीची यादी सोमवारी जाहीर केली आहे. त्यांनतर यावरून विरोधकांनी सरकारावर टीका केली आहे. तर महाविकास आघाडी सरकारचा कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांची फसवणूक करणारा असल्याचा म्हणत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलेला आहे.
पाटील म्हणाले, सप्टेंबर- अक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने 94 लाख हेक्टर क्षेत्राचा नुकसान केलं. उभ पिक डोळ्यासमोर गेलं. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना 25 हजार प्रती हेक्टर तर फळबागांना 50 हजार प्रती हेक्टर नुकसानभरपाई मिळावी असे म्हणाले होते. आता ते सत्तेत आहे, मात्र अजूनही एक रुपयाची मदत मिळाली नाही. त्यामुळे यावरून लक्ष बाजूला नेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फसवी कर्जमाफीची घोषणा केली असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. तर या कर्जमाफीत शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही. आम्ही जी कर्जमाफी केली होती, त्यात 43 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 19 हजार कोटी रुपये प्रत्यक्षात जमा केले. याचा पुरावा म्हणजे या सरकारने 2015 नंतरची कर्जमाफी केली असून, त्यापूर्वीची कर्जमाफी आमच्या काळात झाली असल्याचं यातून स्पष्ट होत असल्याचेही ते म्हणाले आहेत.