Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
टीआरपीमध्ये फेरफार, मराठी चॅनेलसह तीन चॅनेलवर कारवाई
![Mumbai High Court grants bail to Partho Dasgupta, former chief executive officer of BARC, accused in TRP scam](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/TRP.jpg)
मुंबई | टीआरपीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी 3 चॅनेलवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मराठी चॅनेलचाही समावेश आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली.
गेल्या काही दिवसांपासून टीआरपीमध्ये फेरफार करण्यात येत आहे. यामध्ये फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’विरोधात कारवाई करण्यात आली आहे. तर त्यांच्या चालकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ‘रिपब्लिक टीव्ही’चे चालकही रॅकेटमध्ये असल्याचा संशय आहे.
घरात एकप्रकारचेच चॅनेल सुरू ठेवण्यासाठी पैसे दिले गेले असून रॅकेटमध्ये टीआरपी एजन्सीच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचंही परमबीर सिंग यांनी सांगितलं.