Breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामुंबई
जितेंद्र आव्हाडांची कोरोनावर यशस्वी मात
![MHADA announces 100 flats for Tata Cancer Hospital, Jitendra Awhad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/awhad-jitendra.jpg)
ठाणे | संपूर्ण देशात जगात कोरोनाने सगळ्यांना वेठीस धरले आहे. खेळाडू, राजकारणी, कलाकार सगळेच या कोरोनाच्या पेचात अडकले आहेत. अशातच कोरोनाशी दोन हात करणारे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड काल (७ मे)रात्री अखेर ठाण्यातील त्यांच्या घरी कोरोनामुक्त होऊन परतले आहेत.
कोरोनाच्या काळात त्यांनी अनेकांना मदत केली. त्याच दरम्यान, त्यांच्या काही निकट व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांनी स्वत: ला क्वॉरंटाईनही केले होते. सुरुवातीला त्यांचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर अचानक ताप आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आणि तेव्हा त्यांचा दुसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर लगेच उपचार सुरु करण्यात आले होते. आता ते सुखरुप कोरोनावर मात करुन घरी पोहोचले आहेत.