breaking-newsमुंबई

चेंबूरमध्ये ११ व्या मजल्यावरुन पडल्याने २ कामगारांचा मृत्यू

इमारतीचे बांधकाम करत असताना योग्य ती खबरदारी न घेतल्याने कामगारांचा मृत्यू होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. अशीच एक घटना मुंबईतील चेंबूर येथे घडली असून त्यामध्ये २ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चेंबूर येथे आर. के. स्टुडीयोसमोर शबरी पार्क इमारतीमध्ये काम सुरु होते. त्यावेळी काम करताना कामगार ११ व्या मजल्यावरुन खाली पडले. इतक्या उंचीवरुन पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. अहमद शहादत शेख (वय-३२) आणि राजेंद्र बट्टीलाल कोल (वय-४५) अशी त्यांची नावे आहेत.

ही इमारत व्यावसायिक कार्यालयांची ऑफीसच्या खिडक्या लावण्याचे काम सुरु होते. त्यावेळी हे दोघे खाली पडले. त्यांच्या खाली पडण्यामागचे नेमके कारण अद्याप समजले नसून त्यांना त्वरीत बीएमसी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याआधीच यातील दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असून योग्य ती माहिती हाती आल्यावर नेमके कारण स्पष्ट होईल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button