Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
चंद्रकांत पाटलांची गाडी अडवण्याचा प्रयत्न, भाजपचे कार्यकर्ते आक्रमक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/images_1530504300284_Chandrakant_Patil.jpg)
मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या उमेदवार यादीची घोषणा केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोर पक्षातील बंडखोरी थांबवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे. मुंबईतील A9 या शासकीय बंगल्यासमोर चंद्रकांत पाटील यांची गाडी रोखण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला आहे.
भाजपने यंदाच्या निवडणुकीत आतापर्यंत 12 विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं आहे. त्यातच आता उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांचे समर्थक चंद्रकांत पाटलांसमोर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. चंद्रकांत पाटलांच्या गाडीसमोर ठिय्या करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटलांसमोर घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी हटवलं. त्यानंतर पाटील यांनी कशीबशी वाट काढत काढता पाय घेतला. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.