breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

खबरदार !…अन्यथा महिन्याभरात मुंबईत ७० हजार करोना रुग्ण वाढतील

मुंबई | मुंबईतील करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनेही कंबर कसली आहे. मुंबईत येत्या महिन्याभरात सुमारे ७० हजार रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी ३ हजार कोविड-केअर बेड्सची व्यवस्था करण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत. या प्लानिंगनुसार पालिका राज्य सरकारच्या जीटी आणि सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधील ६०० खाटा ताब्यात घेणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,एकाच व्यक्तीच्या निगराणी खाली रुग्णालयांचं कामकाज चालत असेल तर करोनाचा प्रादुर्भाव रोखणं शक्य होतं, असं एका पालिका अधिकाऱ्याने सांगितलं. तर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आम्ही मे महिन्यासाठी ३ हजार क्रिटिकल बेड उपलब्ध करून देण्याची रणनीती तयार केल्याचं राज्याच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी सांगितलं.प्रत्येक सात दिवसाला करोनांच्या रुग्ण संख्येत दुप्पट वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. तसा गणितीय अंदाज आहे. त्यामुळे एका महिन्यात ही संख्या ७० हजार ते ८० हजारापर्यंत जाऊ शकते. इटली, चीन, स्पेनची परिस्थिती पाहता ही रुग्ण संख्या ८५ ते ९० टक्के वाढू शकते, असा आमचा अंदाज आहे, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button