Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
किशोरी पेडणेकर मुंबईच्या महापौरपदी विराजमान, तर सुहास वाडकर उपमहापौरपदी विराजमान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/narauyanagav5.jpg)
मुंबई । शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना मुंबईच्या नव्या महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. शिवसेनेकडून त्यांनी महापौरपदाच्या उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. पेडणेकर या पालिकेतील ज्येष्ठ नगरसेविका असून त्यांनी पालिकेच्या विविध पदांवर काम केलं आहे. आक्रमक नगरसेविका म्हणूनही त्या प्रसिद्ध आहेत. तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे सुहास वाडकर यांनी अर्ज भरला होता. त्यांची उपमहापौर म्हणून निवड झाली आहे.