breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
काँग्रेसची लोकसभेची पहिली यादी जाहीर, वाचा कोणाकोणाला मिळाली उमेदवारी!
मुंबई: काँग्रेस पक्षाने गुरूवारी रात्री आपल्या १५ उमेदवारांची नावे जाहीर करत लोकसभा निवडणुकीची पहिली यादी प्रसिद्ध केली. यात उत्तर प्रदेशमधील ११ जागांवरील तर गुजरातमधील ४ जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीतून लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. तर रायबरेलीमधून सोनिया गांधी निवडणूक लढविणार आहेत. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी निवडणूक लढविणार नाहीत. काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक यांनी पहिली यादी जाहीर केली आहे.