काँग्रसच्या अध्यक्ष पदासाठी ‘या’ नेत्याला अधिक पसंती
नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी लवकरच निवड प्रक्रिया
पिंपरी | टीम ऑनलाईन
कॉंग्रेसच्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामध्ये एका गट प्रियांका गांधी यांना पसंती देत आहे. तर दुसरा गट राहुल गांधी यांना. दरम्यान राहुल गांधी यांनाच अधिक लोकांची पसंती असल्याचे प्रतिपादन काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केले. ९९.९ टक्के काँग्रेस नेत्यांना हेच वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
बिहार निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षात संघटनात्मक बदल व्हावे, यासाठी काँग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्रे लिहली होती. तर सध्या काँग्रेसच्या भावी अध्यक्षाच्या मुद्यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अगोदर राहुल गांधी यांचे नाव समोर येत होते. मात्र आता प्रियंका गांधी यांचे नाव देखील पुढे येत आहे. या दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांचं एक महत्वपूर्ण विधान समोर आले आहे. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष बनावेत असं माझ्यासह ९९.९ टक्के काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांना वाटत असल्याचं सुरजेवाला यांनी नमूद केले आहे. विशेष म्हणजे या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षातील त्या आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांशी सविस्तर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधी यांनी आज (शनिवार, दि. 19) १० जनपथ येथील निवासस्थानी बैठक बोलावली आहे.
काँग्रसच्या नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी लवकरच निवड प्रक्रिया सुरू होईल. काँग्रेसचे इलेक्ट्रोल कॉलेज, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य, काँग्रेस कार्यकर्ते आणि सदस्य हे या पदासाठी जो योग्य आहे त्याची निवड करतील. माझ्यासह काँग्रेसच्या ९९.९ टक्के लोकांना वाटतं की राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष बनावेत. असं सुरजेवाला यांनी म्हटलं असल्याचं एएनआयाने वृत्त दिलं आहे.





