कल्याणमधील पत्री पुलाच्या गर्डरचे काम सुरू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/Kalyan-Patri-Bridge.jpg)
कल्याण – कल्याणमधील पत्री पुलाचा गर्डर बसवण्याच्या कामासाठी आज आणि उद्या मध्य रेल्वेवर चार तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे. या कामास अखेर आज सुरुवात झाली असून गर्डर बसवताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे स्वतः उपस्थित राहून कामात लक्ष घालणार आहेत.
ब्रिटीशकालीन पत्रीपूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने 2018 साली पाडण्यात आला होता. कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या या पत्रीपुलाचे काम मागील दीड वर्षांपेक्षा अधिक काळापासून सुरू आहे. या कामामुळे नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मात्र आता गर्डर टाकल्याने कामाला वेग येण्याची शक्यता आहे. हा गर्डर बसवण्यासाठी मोठ्या क्रेनचा वापर केला जाणार आहे. पूलाचे गर्डर हैद्राबाद येथील कंपनीत तयार करण्यात आले असून ते 700 मेट्रीक टनाचे आहेत.
दरम्यान, आज आणि उद्या मध्य रेल्वेवर घेण्यात येणाऱ्या ब्लॉकच्या काळात 250 लोकल रद्द करण्यात आल्या आहेत, परंतु कल्याण-डोंबिवली मार्गावर विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत.