कंगना विरोधात पोलिसात गुन्हा दाखल
![Actress Kangana Ranaut's troubles escalate over controversial statement regarding Sikhs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/kangna.png)
मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सतत वादग्रस्त वक्तव्य करणारी अभिनेत्री कंगना राणौत चांगलीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आता कंगना विरोधात विक्रोळी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत बॉलीवूड माफियांशी संबंध असल्याचे वक्तव्य करून बदनामी केल्याप्रकरणी कंगना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कंगनाच्या बेकायदा बांधकामावर केलेल्या कारवाई प्रकरणी कोणत्याही प्रकारे थेट संबंध नसतानाही उद्धव ठाकरेंवर आरोप करत बदनामी केल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. कंगनाने ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर आरोप केले आहेत.
कंगनाने एक व्हिडिओ ट्विट करत ‘आज माझं घरं तुटलंय, उद्या तुमचा अंहकार तुटेल.’ असं वक्तव्य केलं आहे. मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केल्यामुळे कंगना आक्रमक झाली आहे. कंगनाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलं.