Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?; नवाब मलिक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/malik-khadase-Frame-copy.jpg)
मुंबई | महाईन्यूज
नागपूरमध्ये एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यात वर्तवली जात होती. आणि त्यामुळे खडसे भाजपाला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागलेली आहे.एकनाथ खडसे भाजपातील ज्येष्ठ नेते आहेत व गेल्या ४५ वर्षाहून अधिक काळ ते भाजपामध्ये सक्रिय आहेत. पण गेल्या ५ वर्षात खडसे पक्ष नेतृत्वावर नाराज झालेले आहेत.
पक्षासाठी इतका संघर्ष करुनही माझ्यावर अन्याय झाला अशी भावना एकनाथ खडसेंनी वारंवार बोलून दाखविलीली आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, असा सवाल विचारला जात आहे. व खडसे भाजपवर नाराज आहेत. पण त्यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय अद्याप झाला नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे.