breaking-newsमुंबई

एकनाथ खडसेंना महावितरणकडून 1 लाख 4 हजारांचे वाढीव वीज बिल

मुंबई – राज्यात लॉकडाऊन काळात सामान्य नागरिकांसह अनेक सेलिब्रिटींनाही वाढीव वीजबिलाचा फटका बसला आहे. त्यातच आता भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही महावितरणने चार महिन्यांचे तब्बल १ लाख ४ हजारांचे वाढीव वीज बिल पाठवून ‘शॉक’ दिला आहे.

एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील मुक्ताईनगरमधील घरासाठी महावितरणने एप्रिल ते जुलै या चार महिन्याचे तब्बल १ लाख ४ हजारांचे वाढीव वीज बिल पाठवले आहे. एकनाथ खडसे यांनी विजेचा वापर कमी असूनही इतके बिल आल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. लॉकडाऊनच्या या काळात येणारी वीज बिले अवास्तव असून ती न भरण्यासारखी आहेत. महावितरणने अशा पद्दतीने लोकांना वेठीस धरु नये. सरकारने महावितरणकडून पाठवण्यात येणाऱ्या अवास्तव बिलांची चौकशी केली पाहिजे. तसेच बिलामध्ये सवलत दिली पाहिजे, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button