breaking-newsमुंबई

उमेदवारीवरून मुंबई काँग्रेसमध्ये घोषणाबाजी

मुंबई – मुंबईतील उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या बठकीत घोषणाबाजी आणि गोंधळ झाला.

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत शहरातील सहाही मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. उत्तर मध्यच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी पक्षांतर्गत वादाला कंटाळून निवडणूक न लढण्याचे जाहीर केले आहे. त्याचे पडसाद बैठकीत उमटले. या वेळी प्रिया दत्त आणि नसिम खान समर्थकांमध्ये घोषणाबाजी झाली. प्रिया दत्त यांना निर्णयाचा फेरविचार करण्यास लावावा अशी मागणी झाली. गोंधळामुळे अशोक चव्हाण यांना मध्यस्थी करावी लागली.

उत्तर पश्चिम मतदारसंघात संजय निरुपम आणि कृपाशंकर सिंग यांनी दावा केला आहे. येथेही चुरस आहे. दक्षिण मुंबईत फक्त मििलद देवरा यांचे नाव पुढे आले. दक्षिण मध्यमध्ये एकनाथ गायकवाड यांच्यासह नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी इच्छा व्यक्त केली आहे.

उत्तर मुंबईत  कोणी उत्साह दाखविलेला नाही. अभिनेत्री नगमा यांनी दोन मतदारसंघात  दावा केला आहे. ईशान्य मुंबई हा राष्ट्रवादीकडे असलेला मतदारसंघ यंदा पक्षाला मिळावा अशी मागणी करण्यात आली.

सर्व मतदारसंघांचा प्राथमिक आढावा घेण्यात आला. घोषणाबाजीचा छोटा अपवाद वगळता बठकीत चर्चा चांगली झाली. उमेदवारांच्या नावांची महिनाअखेर हेणाऱ्या बठकीत प्रदेशला शिफारस केली जाईल.

-संजय निरुपम, मुंबई काँग्रेस अध्यक्ष

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button