उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निलेश राणे यांची टीका; काय म्हणले वाचा?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/1614656587473.jpg)
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपल्याचे पाहायला मिळाले. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मराठवाडा, विदर्भातील वैधानिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा मुद्दा उपस्थित केला. तर याला उत्तर देताना अजित पवारांनी ज्या दिवशी राज्यपाल 12 आमदारांची नावे जाहीर करतील त्या दिवशी वैधानिक विकास महामंडळ घोषित करू, असे स्पष्ट केले आहे.
१२ आमदार जाहीर होतील तेव्हा वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना करू असं काल अजित पवार म्हणाले. मराठवाडा विदर्भातील जनतेचा हा अपमान आहे. अजित पवार मराठवाडा विदर्भात आले तर त्यांचं स्वागत त्यांच्या ताफ्यावर दगडी मारून केला पाहिजे. १२ आमदार आणि विकास महामंडळाचा काय संबंध??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 2, 2021
अजित पवारांनी थेट राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न सुटल्यावर मराठवाडा-विदर्भ वैधानिक विकास महामंडळाबाबतची घोषणा करू असे म्हटल्याने भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी देखील 12 आमदार आणि विकास महामंडळाचा काय संबंध?, असा सवाल केला आहे.
मराठवाडा विदर्भातील जनतेचा हा अपमान आहे. अजित पवार मराठवाडा विदर्भात आले तर त्यांचं स्वागत त्यांच्या ताफ्यावर दगडी मारून केले पाहिजे, अशी खरमरीत टीका निलेश राणेंनी केली.
दरम्यान, अजित पवारांच्या वक्तव्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यपाल हे कुठल्या पक्षाचे आहेत का? त्यांना घटनात्मक अधिकार आहेत. आज तुम्ही जे बोलला आहात, दादा तुम्हाला विनंती आहे की असं बोलू नका. विदर्भ-मराठवाड्यातली जनता माफ करणार नाही. 12 आमदारांकरता तुम्ही मराठवाडा-विदर्भच्या जनतेला ओलीस ठेवणार का?, असा सवाल त्यांनी केला.