Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्री बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांचे खासगी निवासस्थन ‘मातोश्री’ उडवून देण्याच्या धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुबई येथून 3 ते 4 वेळा हा फोन आल्याची प्राथमिक माहिती आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा हस्तक असल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या निवासस्थानातून बाहेर पडले आहेत. मात्र, मातोश्री परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मोठ्या प्रमाणवर वाढविण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते आतापर्यंत ‘मातोश्री’ निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात असतात. सध्यास्थितीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button