इतिहासात अर्णबला हिरो म्हणून ओळखलं जाईल- कंगणा राणावत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/Arnav-goswami-kangana-ranavat.jpg)
मुंबई – वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांना अटक झाली असून आज त्यांना तळोजा तरुंगात पाठवण्यात आलं आहे. या कारवाईविरोधात अनेक भाजप नेत्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. त्याचप्रमाणे अभिनेत्री कंगना रानौत हिनेही या प्रकरणावर आपलं मत प्रदर्शित केलं आहे.
अर्णब गोस्वामी यांना जितकं टॉर्चर केलं जाईल ते तिकडे कणखर होऊन बाहेर येतील असं म्हटलं आहे. याचसोबत इतिहासात अर्णब यांना हिरो म्हणून ओळखलं जाईल असंही कंगनाने म्हटलं आहे.
बॉलिवूडमधील ड्रग्ज माफीया, चाईल्ड ट्रॅफिकिंग आणि सोनिया गांधी यांचं खरं नाव घेतल्यामुळे टॉर्चर केलं जात असल्याचं कंगना म्हणाली. अन्वय नाईक प्रकरणात महाराष्ट्र सरकारने अर्णब गोस्वामीविरोधात केलेल्या कारवाईवरही कंगनाने प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.
अर्णब यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सरडा यांचीही रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. या तिन्ही आरोपींना मागील चार दिवसांपासून अलिबाग नगरपालिका शाळेत कैद्यांसाठी असलेल्या क्वारंटाइन सेंटर मध्ये ठेवण्यात आलं होतं. अर्णब गोस्वामी व अन्य दोन आरोपींनी अटकेला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका केलेली आहे. या याचिकेवरील निकाल न्यायालयानं ९ नोव्हेंबरपर्यंत राखून ठेवला आहे.