Breaking-newsमुंबई
अबू सालेमच्या साथीदाराला मुंबईतून अटक

मुंबईवरील 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी गँगस्टर अबू सालेमचा जवळचा साथीदार गजेंद्र सिंह याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने बुधवारी रात्री मुंबईतून अटक केली. गजेंद्र हा अबू सालेमच्या पैशांची मालमत्तांमध्ये गुंतवणूक करायचा. त्याने सालेमचे पैसे दिल्ली आणि परिसरातील मालमत्तांमध्ये गुंतवले. त्याचे गँगस्टर खान मुबारक याच्याशीही जवळचे संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गजेंद्रने 2014 मध्ये दिल्लीतील व्यावसायिकाकडून 1 कोटी 80 लाखांची खंडणी उकळली होती. व्यावसायिकाने ते पैसे मागितले, त्यावेळी गजेंद्रने नोएडा परिसरात खान मुबारकच्या गुंडांकरवी व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या होत्या. कारमध्ये बसलेला व्यावसायिक थोडक्यात बचावला होता, असे स्पेशल टास्क फोर्सचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक राज कुमार मिश्रा यांनी स्पष्ट केले.





