breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘…अन्यथा राज्यात आंदोलनाचा उद्रेक वाढेल’, मराठा समन्वयक आक्रमक

नवी मुंबई | सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज पेटून उठला आहे. आज झालेल्या बैठकीतही मराठा समन्वयक आक्रमक झाल्याचं सांगण्यात येतंय. आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समन्वयक आणि पदाधिकारी यांनी तीव्र भावना व्यक्त करत येणाऱ्या काळात उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर अजूनही ठोस निर्णय न घेतल्यामुळे येणाऱ्या काळात राज्यात आंदोलनाचा उद्रेक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आज मराठा समन्वयकांची बैठक नवी मुंबईत पार पडली. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. तसेच, या बैठकीत MPSC च्या परिक्षांबाबत चर्चा करण्यात आली. जर परीक्षा रद्द झाली नाही तर उधळून लावणार असल्याचा इशारा मराठा समजाकडून देण्यात आला आहे. तर मुख्यमंत्री यांच्या घरासमोर आणि परीक्षा केंद्रावरसुद्धा आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हं आहेत.

माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबईच्या माथाडी भवनमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीच्यानिमित्ताने उदयनराजे आणि संभाजी राजे पहिल्यांदाच मराठा आरक्षणच्या मुद्द्यावर एकत्र येणार होते. पण ऐनवेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बैठकीला येणे रद्द केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button