अगोदर जिम-थिएटर, आता ‘या’ व्यावसायिकांसाठी खासदार सुप्रिया सुळे मैदानात
![‘Maharashtra State Fire Brigade’ should be established; MP Supriya Sule made a demand to the Chief Minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/5BMSUPRIYASULE.jpg)
मुंबई: रेस्टॉरंटस व्यावसायिकांच्या बाबतीत सहानुभूतीपुर्वक विचार करुन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन मागणी केलेली आहे. याआधी जिम आणि सिंगल स्क्रीन थिएटर सुरु करण्याबाबतही सुळे यांनी पाठपुरावा केला होता. “कोरोनाच्या संकाटामुळे राज्यातील रेस्टॉरंटचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. सध्या पार्सल्सची मुभा देण्यात आली असली, तरी ती या उद्योगाला सावरण्यासाठी पुरेशी नाही. याशिवाय अनेक रेस्टॉरंट चालकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलेले आहे.
“रेस्टॉरंट व्यावसायिकांना होणारा त्रास लक्षात घेता, रेस्टॉरंटस् सुरु होणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक असणारे सोशल डिस्टन्सिंग आदीचे आवश्यक दिशानिर्देश देखील जारी करावेत. आपणास विनंती आहे, की कृपया या व्यावसायिकांच्या बाबतीत सहानुभूतीपुर्वक विचार करुन सकारात्मक निर्णय घ्यावा” अशी विनंती सुळे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करुन केलेली आहे. ‘महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लब’चे मुख्य समन्वयक वेदांशू पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना लिहिलेले पत्रही त्यांनी सोबत जोडलेले आहे.