‘अंगात नुसतं विदर्भाचं रक्त असून चालत नाही, तर…’; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
![‘If there is only Vidarbha blood in the body, it does not work, but…’; Fadnavis targets Uddhav Thackeray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/Uddhav-and-CM-1.jpg)
मुंबई – विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांचं ‘वर्षभराचा लेखाजोखा’ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या प्रकाशन सोहळ्यावेळी भाजप नेत्यांकडून तुफान फटकेबाजी करण्यात आली. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. अंगात केवळ विदर्भाचं रक्त असून चालणार नाही, तर विदर्भाशी प्रामाणिक राहा, अशा शब्दांत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
वाचा :-मावळ तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक संकटात; आमदार सुनील शेळकेंनी घेतली शरद पवारांची भेट
फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकतेच म्हणाले होते की, आमच्यामध्ये विदर्भाचं रक्त आहे. त्यांच्यावर किमान हे म्हणण्याची तरी वेळ आली याचं आम्हाला समाधान आहे. पण विदर्भाचं नुसतं रक्त असून चालणार नाही कारण अनेक नेत्यांनी विदर्भाशी बेईमानी केली तशी बेईमानी तुम्ही करु नका.
मराठवाड्यात सिंचनाची आणि वॉटर ग्रीडची कामं बंद का आहेत. याबद्दल तुम्ही चकार शब्द का काढत नाही? असा प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.दरम्यान, प्रविण दरेकर यांच्या कारकिर्दीच्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ पुस्तकाच्या प्रकाशनावेळी भाजप नेते आशिष शेलार, गिरीश महाजन, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांची उपस्थिती होती.