TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

माजी नगरसेवक प्रकाश मलशेट्टी यांच्यासह 100 हून अधिक कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

पिंपरी : माजी नगरसेवक प्रकाश मलशेट्टी, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव कुसाळकर यांच्यासह काळेवाडी, राहटणी परिसरातील 100 हून अधिक कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रवेश केलेल्या या कार्यकर्त्यांचे उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांनी स्वागत केले.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन आणि जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यांच्या प्रयत्नातून काळेवाडी, राहटणी परिसरातील 100 पेक्षा अधिक इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. प्रकाश मलशेट्टी यांनी काळेवाडी परिसराचे महापालिकेत नेतृत्व केले आहे. या भागात त्यांची चांगली राजकीय ताकद आहे. त्यांनी आता बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख निलेश तरस, शहर संघटक रवींद्र ब्रम्हे, समन्वयक हेमचंद्र जावळे, ॲड. प्रवीणकुमार गायकवाड, उपशहर प्रमुख अंकुश कोळेकर, तुकाराम कांचन, उद्योजक रुपेश यादव, दत्ता मोरे, प्रदीप कुमार, राजकुमार बालाजी, रमेश जाधव, मोतीराम देडे, मनोहर गासड, सुरेश पट्टेवर, गौरव नागणे, संदिपान दाभाडे, सुमित दाभाडे, शिवाजी गरड, जितेंद्र विश्वकर्मा, कुमार मोरे, महेश शहा, राजेश विश्वकर्मा, अनिल विश्वकर्मा, बबलू विश्वकर्मा, प्रदीप शर्मा, शिवराम दळवी, विजय एकशिंगे, किशोर एकशिंगे, चेतन मोरे, हरींद्र विश्वकर्मा, सुनील विश्वकर्मा, धर्मेंद्र विश्वकर्मा, कृपाशंकर शर्मा, कृपाशंकर विश्वकर्मा, राजेंद्र भोसले, मनोज विजयकर यासह अनेक कार्यकर्त्यांनी खासदार बारणे यांच्या नेतृत्वात बाळासाहेबांच्या शिवसेनेत मोठ्या जल्लोषात फटाके वाजवून घोषणा देत प्रवेश केला.

”बाळासाहेबांच्या शिवसेनेत कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रवेश करत आहेत. आता माजी नगरसेवकही पक्षात येवू लागले आहेत. पक्षाचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याने प्रेरित होवून कार्यकर्ते पक्षप्रवेश करत आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आणि भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार जनहिताचे निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची कार्यशैली राज्यातील जनतेला भावली आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यास माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते पसंती देत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे संघटन मजबूत होत आहे. त्याचा आगामी महापालिका निवडणुकीत नक्कीच फायदा होईल”, असा विश्वास उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button