breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

PM Narendra Modi : अमेरिकेच्या संसदेतही मोदी-मोदीचा गजर!

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या संसदेला संबोधित केलं. मोदींनी यावेळी आपल्या भाषणात दहशतवाद, रशिया युक्रेन युद्ध यासह विविध मुद्यांवर भाष्य केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, २०० वर्षांपासून भारताने विश्वास संपादन करून तो वृद्धींगत केला आहे. भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर महात्मा गांधी आणि मार्टिन लूथर किंग यांचा प्रभाव आहे. दोन शतकं दोन्ही देश एकमेकांवर प्रभाव कर्तव्य आहे. भारतात २ हजार ५०० राजकीय पक्ष आणि १ हजारांहून अधिक भाषा बोलल्या जातात. दर १०० मैलांवर खाद्यसंस्कृतीही बदलते.

Image

हेही वाचा – PCMC : पिंपरी-चिंचवडकरांच्या उपयोगकर्ता शुल्कसह वसुलीला विरोध

Modi Promotes India to Congress After Biden Meeting: Live Updates - The New  York Times

जगाच्या लोकशाहीचा सहावा भाग भारत आहे. भारताचा विकास हा इतर देशांवर सकारात्मक परिणाम करणारा ठरतो. कारण भारत जेव्हा प्रगती करतो तेव्हा इतर देशही प्रगती करतात. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास असा नाराही यावेळी मोदींनी आपल्या भाषणात दिला. यावेळी संसदेत मोदी-मोदींचा गजर सुरू झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button