breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

भीमा पाटस कारखान्यावरून दौंडमध्ये पोस्टर वॉर सुरू; राऊतांच्या निषेधाचे बॅनर

आमदार राहुल कुल समर्थकांनी लावले संजय राऊतांचे पोस्टर

पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर भीमा पाटस साखर कारखाना प्रकरणी ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याचे पडसाद दौंड मध्ये पडताना पहायला मिळत आहेत. दौंड तालुक्यात यावरून पोस्टर वॉर सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दोन दिवसापूर्वी संजय राऊत यांच्या आभराचे बॅनर दौंडमध्ये झळकले होते आता त्या बॅनर शेजारीच संजय राऊत यांच्या निषेधाचे बॅनर झळकत आहेत.

भीमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष, आमदार राहुल कुल यांच्यावर १३ मार्चला संजय राऊत यांनी ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे राहुल कुल यांना अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र हे सर्व आरोप बिन बुडाचे असल्याचं राहुल कुल समर्थक म्हणत आहेत. दौडमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेचे दहन, जोडे मारत निषेध नोंदवला होता. मात्र आता पोस्टर वॉर सुरू झाल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

एकीकडे संजय राऊत यांच्या आभाराचे बॅनर आणि दुसरीकडे संजय राऊत यांच्या निषेधाचे बॅनर दोन्ही शेजारी शेजारी लागल्याने स्थानिक राजकारणात चांगलेच तापल्याचे पहायला मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button