TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोकणवासी प्रवाशांच्या मदतीला आमदार महेश लांडगे धावले !

  • ऐनवेळी बंद केलेली ग्रुप बुकिंग व्यवस्था केली पूर्ववत
  • पिंपरी-चिंचवडसह पुण्यातील कोकणवासीयांनी मानले आभार

पिंपरी । प्रतिनिधी
ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वल्लभनगर आगारातून कोकणवासीयांसाठी ग्रुप बुकिंग व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी आगारप्रमुखांशी चर्चा करुन ही सुविधा पूर्ववत केली. दि.२८ ते ३० ऑगस्टदरम्यान एकूण १२ गाड्या गुप बुकिंगसाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे कोकणवासी प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
कोकणवासी प्रवशांची अडचण सोडवण्यासाठी आमदार लांडगे यांनी थेट वल्लभनगर आगाराला भेट दिली. याठिकाणी आगार प्रमुखांशी सकारात्मक चर्चा करुन ग्रुप बुकिंगसाठी गाड्या उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना केली.
यावेळी माजी नगरसेवक शितल उर्फ विजय शिंदे यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे, कोकण प्रवासी संघाचे अध्यक्ष दादा हाटले, सिंधुदुर्ग एकता मित्र मंडळाचे विलास गवस, सचिन फोंडके, रुपेश गवस, महेश देसाई, जयेश भुवड, बाळा गुरव, मिथुन चव्हाण, प्रकाश चव्हाण, प्रदीप पडवळ, रवी देऊळकर, सागर गावडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.


गणेशोत्सवाकरिता दरवर्षी पिंपरी-चिंचवड शहरातून हजारोच्या संख्येने कोकणवासी आपापल्या गावाला जात असतात. या करिता शहरातील विविध संस्थेच्या माध्यमातून एस.टी. महामंडळाकडून ‘ग्रुप बुकिंग’द्वारे गाड्यांचे बुकिंग केली जाते. यावर्षी वल्लभनगर एसटी आजारातून ग्रुप बुकिंगला मान्यता दिली होती. त्याप्रमाणे जवळजवळ ३० गाड्यांकरिता प्रवाशांचे पैसे जमा करून ‘ग्रुप बुकिंग’ घेण्यात आली. मात्र, ऐनवेळी ‘ग्रुप बुकिंग’ला गाड्या देता येणार नाही, असे सांगण्यात आले. परिणामी, कोकणात जाणाऱ्या ग्रुप बुकिंगमधील प्रवाशांची अडचण झाली होती.
दरम्यान, शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आगा प्रमुखांना याचा जाब विचारला. मात्र, प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. अखेर काही प्रवाशांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे दाद मागितली.प्रवाशांची अडचण लक्षात घेत आमदार लांडगे यांनी थेट वल्लभनगर आगारात भेट दिली.
*
प्रवाशांना वेठीस धरु नका…
आगार प्रमुख आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कोकणवासी प्रवाशांना सुविधा देण्यात प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशा सूचना दिल्या. तसेच, गाड्या उपलब्ध करुन देण्याबाबत परिवहन मंत्र्यांकडेही मागणी करु, पण प्रवाशांना वेठीस धरू नका, असे ठामपणे सांगितले आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button