breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिर्डी साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळे

नगर –  दुसर्‍या क्रमांकाचे देवस्थान असलेल्या शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी अखेर कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड. जगदीश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिर्डी मंडळाचे पदाधिकारी आणि विश्वस्त अशी 12 जणांची नावे राजपत्र जारी करून जाहीर करण्यात आली आहेत. पाच जणांची नियुक्ती अद्याप करण्यात आलेली नाही.

शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्तपदी राष्ट्रवादीच्या श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, काँग्रेसचे अविनाश दंडवते, काँग्रेसचे संगमनेर वकील बार संघटनेचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची समर्थक अ‍ॅड. सुहास आहेर, राहुरी येथील साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सुरेश वाबळे, गणेश कारखान्याचे माजी संचालक महेंद्र शेळके, माजी विश्वस्त एकनाथ गोंदकर, शिवसेनेचे राहुल कणाल, नाशिकचे माजी आमदार जयवंतराव जाधव, यांच्यासह शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांची पदसिध्द विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button