ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बाळासाहेब साळुंके यांना गुणवंत कामगार पुरस्कार

पिंपरी चिंचवड | टाटा मोटर्स कं. चे कर्मचारी श्री बाळासाहेब साळुंके यांना राज्याचे कामगार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व राज्य कामगार मंत्री ओमप्रकाश (बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी मुंबई येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे. 25 हजार रु

रोख सन्मानचिन्ह मानपत्र व मेडल असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सत्कारमूती बाळासाहेब साळुंके हे मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्यातील काल या गावचे सुपुत्र आहेत ते १९९६ पासून टाटा मोटर्स मध्ये कार्यरत आहेत ते माऊली नागरी सहकारी पतसंस्थेचे १० वर्षे चेअरमन होते त्यांनी विद्यार्थ्यासाठी गुणगौरव स्केटींग, कराटे, सायकलीग आशा वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन करत असतात वृक्षारोपण संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान अरोग्य शिबिर तसेच मराठवाडा जनविकास संघ, तिरंगा किडा मंडळ संस्कार प्रतिष्ठण, टाटा मोटर्स समाज विकास केंद्र आशा अनेक मंडळाचे ते पदाधिकारी आहेत मडळाच्या माध्यमातून ते सतत समाजपयोगी कार्यक्रम राबवत असतात.

‘कोविड काळामध्ये गोरगरिबासाठी अन्नधान्य किराणा, कपडे वाटप, कोविउ बाधिताना फळे वाटप, त्यांना दिलासा देणे, उपचारासाठी रुग्णालयामध्ये जागा मिळवून देणे रक्तदान करणे रक्तदान शिविरा चे आयोजन करणे अशी अनेक कामे त्यांनी केली आहेत.

नदी प्रदूषण होऊ नये म्हणून निर्माल्यदान पर्यावरणपुरक जलपर्णी काढणे अशी अनेक कामे ते करत आहेत. त्यांनी पुरस्काराची रक्कम त्यांच्या गावातील तुळजाभवानी मंदिराच्या उभारणीसाठी दिली आहे. गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्यामुळे टाटा मोटर्स शिरपेचात मानाचा तुरा उमटला आहे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व व युनियन प्रतिनिधी व पदाधीकाऱ्यांनी त्यांचा सन्मान व कौतूक केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button