breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

भोसरी येथे गायत्री सखी मंचतर्फे गुणवंत विद्यार्थी गौरव; कविता भोंगाळे-कडू यांचा पुढाकार

  • भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती

पिंपरी: भोसरी येथे  भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा, गायत्री सखी मंच, भोसरी  व स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ  यांच्या संयुक्त विद्यमाने गत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये इयत्ता दहावी व बारावी  परीक्षेत दैदीप्यमान भोसरी परिसरातील  यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा आयोजित करण्यता आला.

भोसरीतील कै.  अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न् झाला. यावेळी पिंपरी – चिंचवड महानगर पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी संजय नाईकडे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक हनुमंत कुबडे, रामदास थिटे, मुरलीधर साठे, दिगंबर ढोकले आदी  उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली.

आमदार लांडगे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणासोबत  मैदानी खेळाकडे लक्ष देत स्वत:ला शारीरिकदृष्ट्या तंदूरुस्त ठेवावे. स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडाळाचे सर्वच उपक्रम लोकप्रिय असतात येथे विध्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत सामाजिक जीवनात कसे जगावे याचे धडे शिकवले जातात.

स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडाळाचे अध्यक्ष श्विनायकराव भोंगाळे यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाबाबत व “ नेतृत्वा करीता वाचन ” या संकल्पनेबाबत मार्गदर्शन केले. स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका कविताताई भोंगाळे- कडू यांनी विद्यार्थ्यांना पुढील उच्च  शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधींबाबत सखोल मार्गदर्शन केले व भविष्यातील वाटलीस शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून  कविताताई भोंगाळे- कडू  यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या काव्यमंचचे मान्यवरांच्या हस्ते  अनावरण करण्यात आले. याप्रसंगी  स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसरक मंडळाचे सचिव संजय भोंगाळे, संचालिका सरिता विखे ,  मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली भागवत,  कार्यकारी संचालिका काजळ क्षतीजा, गायत्री विद्यालय मोशीचे मुख्याध्यापक शशिकांत जोडवे, गोविंद, गायत्री विद्यालय, चऱ्होलीच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे, ज्योती बहीरट व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत बारी यांनी केले, तर कामिनी चव्हाण यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button