breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्लोबल टेंडर पध्दतीने लस खरेदी करणार : महापौर उषा उर्फ माई मनोहर ढोरे

पिंपरी | प्रतिनिधी

संपुर्ण देशासह पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुध्दा कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजने अंतर्गत सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करणे हा सर्वात प्रभावी उपाय ठरलेला आहे. पिंपरी चिंचवड कोरोनामुक्त होण्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव व कोरोना मुक्त शहर हा उददेश्य साध्य करण्यासाठी प्रतिबंधात्मक लस उत्पादक कंपनीकडुन ग्लोबल टेंडर पध्दतीने लस थेट खरेदी करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर उषा उर्फ माई मनोहर ढोरे यांनी दिली. लस खरेदी संदर्भात स्थायी समिती अध्यक्ष ऍड.नितीन लांडगे यांना पत्रानुसार सुचना करण्यात आल्याचेही महापौर यांनी सांगितले.

सद्यस्थितीमध्ये शहरासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस शासनाकडुन अत्यंत अपुऱ्या प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांचे लसीकरण होण्यास बराच कालावधी लागु शकतो. शासनाने अगोदरच लसीकरणाबाबत नियमावली लावलेली आहे. तसेच, शहरात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यानुसार लस देखील त्याच प्रमाणात आवश्यक आहे. शासनाकडून शहरासाठी जो लसींचा साठा उपलब्ध होतो, त्यातही शहराबाहेरील नागरिक नोंदणी करून त्याचा फायदा घेतात. त्यामुळे लसींचा पुरवठा पुरेशा प्रमाणात नसल्याने शहरातील नागरिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागते.

पत्रकार समाजाचा प्रतिबिंब असतो. निर्भिड, सडेतोड आणि पारदर्शक पत्रकारीकेच्या माध्यमातून पत्रकारांनी दिलेले योगदान समाजासाठी हितकारक असून अशा पत्रकारांची जपणूक करणे  हे सर्वांचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले. कोरोना संकटकाळात जोखीम पत्करुन वार्तांकन करणारे पत्रकार ख-या अर्थाने फ्रंटलाईन हिरो आहेत असेही त्या म्हणाल्या.

महानगरपालिकेच्या वतीने पत्रकारांसाठी पहिल्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेचा शुभारंभ महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
          यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, जिजामाता रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगिता तिरुमणी, माहिती जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
          कोरोना संकट काळात पत्रकार जीवाची पर्वा न करता वार्तांकन करीत आहेत. लॉकडाऊन काळात रोजगार गमावलेल्यांना धीर देण्याचे काम प्रसारमाध्यमांनी केले. शिवाय गरजू नागरिकांसाठी मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. कोरोना काळात सेवा बजावणा-या प्रत्येकाला प्रसारमाध्यमातून लोकांसमोर आणल्याने सेवाव्रती कोरोना सेवकांना सेवा करण्याचे अधिक बळ मिळाले. पत्रकारांनी स्वत:सह कुटूंबाचे आरोग्य जपावे असे अवाहन महापौर माई ढोरे यांनी केले.         

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button