मराठवाडा

आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या स्थानिक निधीतून हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयास रुग्णवाहिका

नांदेड| हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या स्थानिक विकास निधीतून हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयास रुग्णवाहिका देण्यात आली असून जळगावकर यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आज दिनांक 7 ऑक्टोंबर रोज बुधवारी पार पडला. यावेळी नांदेड जिल्हाधिकारी विपीन इटंनकर यांची प्रमुख उपस्थिती होती
तालुक्याची वाढती लोकसंख्या बघता हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेची कमतरता भासू लागली होती. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय येथे वेळेवर खाजगी वाहन सुद्धा रुग्णांना मिळत नव्हते, परिणामी रुग्णांची व रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी हेळसांड होताना दिसून येत होती.

त्यामुळे आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी यांच्या स्थानिक विकास निधीतून हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयास रुग्णवाहिकेची व्यवस्था करून देत त्याचा लोकार्पण सोहळा आज दि 7 ऑक्टोंबर रोज बुधवारी पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती नांदेड जिल्हाधिकारी विपीन विटणकर यांची होती.

यावेळी उपस्थित ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डी.डी. गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पोहरे साहेब,डॉक्टर माधव भुरके, तहसीलदार गायकवाड साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे साहेब,काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष अफरोज खान पठाण, हिमायतनगर काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष विकास पाटील देवसरकर, माजी नगराध्यक्ष अब्दुल आखिल भाई,गणेश शिंदे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर प्रकाश वानखेडे,शहराध्यक्ष संजय माने, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, पंडित ढोणे,आहाद भाई,युवक शहराध्यक्ष मिर्झा मूनवर,सचिन माने,मुन्ना होळकर,वैभव शिंदे,अंकुश मोरे,बाबा खानसह काँग्रेस कमिटीचे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button