breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

२६ जानेवारीला मनोज जरांगेंचा मोर्चा मुंबईत धडकणार

मुंबई | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारी रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मनोज जरांगे यांनी अखेर मुंबईत येण्याचा मार्ग जाहीर केला आहे. मनोज जरांगे पाटील २६ जानेवारीपासून मुंबईत उपोषण करणार आहेत. शिवाजी पार्क आणि आझाद मैदान आम्हाला दोन्ही मैदान लागणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, सापडलेल्या ५४ लाख नोंदींवर तातडीने प्रमाणपत्र वितरीत करण्याचा मुद्दा चर्चेत आला. ग्रामपंचायतींमध्ये त्याची यादी लावणे आणि सगेसोयरे शब्दाविषयीही आमची सरकारबरोबर चर्चा झाली. मागेल त्या मराठ्याला आरक्षण यावरही चर्चा झाली. तसं त्यांना लिहूनही दिलं आहे. सापडलेल्या नोंदी अपलोड करून ठेवायला हवं. गावनमुन्याच्या नोंदीही घेण्याबाबत चर्चा झाली. हे सगळं २० तारखेच्या आत करा असं आम्ही सांगितलंय. सगेसोयरे शब्दावर शासननिर्णय किंवा कायदा पारित करण्यासंदर्भातही सांगितलं आहे. आता बघू काय करतात. पण काहीही होवो, मुंबईला २० जानेवारीला जायचंय म्हणजे जायचंय. आशेवर कुणीही राहायचं नाही.

हेही वाचा   –    ‘तिळगुळ घ्या, गोड बोला पण या मोदीला हटवा’; अजितदादांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल 

आम्ही स्पष्टच सांगितलंय. ज्याची नोंद मिळाली, त्याच्या रक्ताच्या सगेसोयऱ्यांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. तरच तुमचं-आमचं जमतंय. नाहीतर नाही जमणार. नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सगेसोयऱ्यांना लाभ मिळायला हवा. त्यासाठी शासननिर्णय किंवा कायदा पारित केल्याशिवाय ते होणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

१९ तारखेला अधिवेशन बोलवून त्यात कायदा पारित करा. त्यांचं म्हणणं होतं फेब्रुवारी महिन्यापर्यंत जाईल. पण मी त्यांना नाही म्हणालोय. हे गुऱ्हाळ चालत राहणार आहे. वेळकाढूपणा होऊ शकतो. आपण सावध राहायला हवं. त्यामुळे २० तारखेला आम्ही जाणारच आहोत. आम्ही मुंबईला गेल्यावर चर्चा सगळी बंद होईल. मग सगळं सोयीस्कर होईल. सरकार जर सुतासारखं सरळ करायचं असेल, सरकारची आडमुठी भूमिका सरकारला सोडायला लावायची असेल, तर मराठ्यांना २० तारखेला मुंबईकडे जावंच लागेल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

असा असणार मार्ग

  • २० जानेवारी पहिला मुक्काम- बीड तालुक्यातील शिरूर मातोरी डोंगर पट्ट्यात. (बीड)
  • २१ जानेवारी दुसरा मुक्काम – करंजी घाट, बारा बाभळी (नगर)
  • २२ जानेवारी तिसरा मुक्काम-रांजणगाव (पुणे जिल्हा)
  • २३ जानेवारी चौथा मुक्काम – खराडी बाय पास, (पुणे)
  • २४ जानेवारी पाचवा मुक्काम- (लोणावळा)
  • २५ जानेवारी ६ वा मुक्काम – वाशी, (नवी मुंबई)
  • २६ जानेवारी ७ मुक्काम आझाद मैदान आंदोलन स्थळी.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button