breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘तिळगुळ घ्या, गोड बोला पण या मोदीला हटवा’; अजितदादांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तशीच फूट पडली आणि अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाला. या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रातला सत्तानाट्याचा अंक अद्याप संपला नसल्याचंच सातत्याने समोर येत आहे. दरम्यान, अजितदादांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओत ते मोदींना हटवण्याची भाषा करत आहेत.

या व्हिडीओमध्ये अजित पवार एका सभेमध्ये भाषण करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडीओ असल्याचं त्यातल्या शब्दांवरून समजतंय. या व्हिडीओत अजित पवार मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना भाजपाला हटवण्याची विनंती समोरच्या उपस्थितांना करताना दिसत आहेत. उद्याच्या मकर संक्रांतीच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, पण या मोदीला हटवा. भाजपाला बाजूला करा, असं आवाहन अजित पवार करताना दिसत आहेत.

हेही वाचा   –    Makar Sankranti | मकर संक्रांत का साजरी केली जाते? जाणून घ्या महत्व..

२०१९ च्या निवडणुकीत मोदींविरोधी भाषणं करणारे अजित पवार आता राज्यात भाजपा व शिंदे गटासह सत्तेत असल्यामुळे हा व्हिडीओ राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. काही नेटिझन्सनी, काय होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू, असा टोला लगावला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button