breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘सरकारच्या अध्यादेशाची वाट पाहणार, तोपर्यंत..’; मनोज जरांगे-पाटील यांचा राज्य सरकारला थेट इशारा

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांडे यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाचा जीआर घेऊन केव्हा येतात, याची वाट पाहतो. पण, जीआर आला नाही, तर आंदोलन थांबणार नाही. उद्यापासून पाणी सुटलं म्हणून समजा, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.

मनोज जरांगे-पाटील म्हणाले, राज्य सरकारचे प्रतिनिधी येऊन निर्णय देऊ असं सांगण्यात आलं. राज्य सरकारच्या प्रतिनिधींना येताना मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन यावा. बैठका आणि चर्चेचे गुऱ्हाळ हे अपेक्षित नाही. आतापर्यंत खूप चर्चा झाली. तुम्ही पहिले पाढे पुन्हा पुन्हा सांगू नका. सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असेल, अशी अपेक्षा आहे. मराठा आरक्षणाचा जीआर घेऊन केव्हा येतात, याची वाट पाहतो. पण, जीआर आला नाही, तर आंदोलन थांबणार नाही. उद्यापासून पाणी सुटलं म्हणून समजा.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मराठा आंदोलकांवर 307 सारखे गुन्हे दाखल केले. ते मागे घेण्यात यावे. सरकारच्या प्रतिनिधींना दोन दिवसांचा वेळ दिला होता. आता एक दिवस शिल्लक आहे. मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार तेव्हाचं थांबणार, असं मनोज जरांगे-पाटील म्हणाले.

हेही वाचा – ‘लाठीचार्जचे आदेश दिल्याचं सिद्ध करा, राजकारण सोडेन’; अजित पवार यांचे विरोधकांना प्रत्युत्तर

१०० टक्के राज्य सरकारने चांगला निर्णय घेतला असेल. मराठा आरक्षणाचे पत्र राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी यावं. जीआर जर आलं नाही. तर आंदोलन थांबणार नाही. उलट उद्यापासून पाणी सुटलं म्हणून समजा. तुमच्या आईला मारलं. त्यांना कायमचे बडतर्फ करा. आम्ही काही मर्डर करण्याची जमात नाही. दहशतवाद्यांचा कॅम्प नाही. हत्यार हाती घेत नाही. खून करण्याच्या उद्देशाने आम्ही काही बाहेर पडत नाही, असं मनोज जरांगे-पाटील म्हणाले.

मराठा घाबरला नाही. खचला नाही. मनानं मजबूत लोकं आहेत. पोरांमध्ये ऊर्जा आहे. मी मराठा आरक्षण मिळवून देणार तेव्हाचं थांबणार. अधिकृत शिष्टमंडळ येईल, असं ऐकलं. शिष्टमंडळ आल्यानंतर उद्या आम्ही सर्व जण बसून पुढचा निर्णय घेऊ. परवा आम्ही आंदोलनाचा दिशा ठरवणार. त्यासाठी मोठी प्रेस घेऊ, असंही मनोज जरांगे-पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button