breaking-newsराष्ट्रिय

राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा नितीन गडकरींकडून आढावा

नवी दिल्ली – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज गोवा येथे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला आहेत. उद्याही ते प्रकल्प संचालक, ठेकेदार, राज्य सरकारी अधिकारी आणि एनएचएआयच्या अधिकाऱ्यांबरोबर ते 700 हून अधिक प्रकल्पांचा आढावा घेणार आहेत. यापैकी 427 प्रकल्पांची अंमलबजावणी एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केली जात आहे. तर 369 प्रकल्पांची अंमलबजावणी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय करत आहे.

2018 हे वर्ष मंत्रालयाने “बांधकाम वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. आढावा घेतला जात असलेल्या 700 प्रकल्पांपैकी सुमारे 300 प्रकल्पांची मार्च 2019 पर्यंत पूर्ण करण्यासाठी निवड केली जाईल.

आढाव्यासाठी आज गोवा, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि पश्‍चिम बंगालमधील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प घेण्यात आले. 27 हजार किलोमीटरचे काम पूर्ण करण्याचे निर्देश गडकरी यांनी अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना दिले आहे. मार्च 2015 पूर्वी त्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button