breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘देशातील कलंक लागलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ’; मनोज जरांगेंचा हल्लाबोल

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात शाब्दित युद्ध सुरूच आहे. मनोज जरांगे यांनी जालन्यातील सभेतुन छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. देशातील कलंक लागलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, हिंगोलीत येऊन गप्पा हाणतो. इकडे येतो आणि जातीवाद करतो. घटनेच्या पदावर बसतो, सरकारसोबत राहतो, आणि महापुरुषांच्या जाती काढणारा, भारतातला सर्वात कलंक लागलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ. जाती-जातीत तेढ निर्माण करणारा, ओबीसी बांधव आणि मराठा बांधव गुण्यागोविंदाने जगत असताना त्यांच्यामध्ये दंगली घडवण्याचं काम करणारा, सगळ्यात वाया गेलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ.

स्वत:चं वय झालेलं असताना, कायद्याच्या पदावर बसलेला असताना, कायदा पायदडी तुडवणारा, इतक्या खालच्या दर्जाचा माणूस आतापर्यंत कधी झाला नाही. या भारत देशात आणि महाराष्ट्रात महापुरुषांच्या जाती काढणारा आतापर्यंत एकही व्यक्ती झाला नाही. यांनी महापुरुषांच्या जाती काढल्या, राजद्रोह सारखा प्रकार हा माणूस करायला लागला आहे. जाती-जातीत दंगली भडकवण्याचा प्रकार करायला लागला आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

हेही वाचा  –  पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शक्तीप्रदर्शन; उद्या जाहीर सभा

मराठा ओबीसी आरक्षणामध्ये आहे. मराठ्यांना ओबीसी आरक्षण न देण्याचा चंग या माणासाने बांधला. मराठा ओबीसी आरक्षणात असताना ७० वर्षांपासून याच्या दबावाखाली सरकार आलं आणि असणाऱ्या नोंदी, मराठ्यांना असणारं आरक्षण या एकट्याने मिळू दिलं नाही. तुम्ही २४ डिसेंबरला छगन भुजबळ यांचं ऐकून दगाफटका केला तर आंदोलन शांततेत असणार पण ते किती डेंजर असणार मग तुम्हाला त्या वेळी समजेल, असा इशाराही मनोज जरांगे यांनी यावेळी दिला.

सरकारला एक शेवटची विनंती आहे, २ तारखेला उद्या एक महिना पूर्ण होतोय. दोन दिवसांत अंतरवलीतले गुन्हा आणि एक महिन्यात महाराष्ट्रातील मागे घ्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावतीने तीन लोकं आले. मंत्री उदय सामंत, धनंजय मुडे, संदीपान भुमरे, अतुल सावे आले होते. यांनी सांगितलं की, गुन्हे मागे घेतले जातील, एकालाही अटक केली जाणार नाही. मग अंतरवलीतील कार्यकर्त्यांना का अटक केली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button