breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरला? मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले..

नवी दिल्ली : इंडिया आघाडीची आज नवी दिल्ली येथे बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील २८ महत्वाचे नेते उपस्थित होते. आजच्या बैठकीत इंडिया आघाडीचा समन्वयक, पंतप्रधान पदाचा चेहरा आणि जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावरून, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महत्वाची माहिती दिली.

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, आम्हाला आधी सर्वांना जिंकून यावं लागणार आहे. जिंकण्यासाठी काय करायचं आहे, याचा विचार करावा लागेल. पंतप्रधान कोण होणार ही नंतरची गोष्ट आहे. खासदारच नाही आले तर पंतप्रधान ठरवून काय फायदा? त्यामुळे आधी आम्ही संख्या वाढवण्याकरता एकत्रितपणे लढून बहुमत आणण्याचा प्रयत्न करू.

हेही वाचा  –  ‘२४ डिसेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास..’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा 

एक-दोन निवडणुका झाल्यानंतर मोदींना प्रचंड गर्व आला आहे की संपूर्ण जगात मीच एकटा नेता आहे, असं त्यांना वाटू लागलं आहे. त्यामुळे आम्ही आधी जिंकण्याचा प्रयत्न करू आणि एक होऊन आम्ही लढू, असंही मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button