breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

विचार कोणताही असो; देश अन्‌ महाराष्ट्र सुरक्षित राहिला पाहिजे!

नागपूर हिवाळी अधिवेशन : आमदार महेश लांडगे यांचा आक्रमक पवित्रा

नागपूर : पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या मस्जिदमध्ये छापा टाकून देशविघातक कारवाई केल्याप्रकरणी एका डॉक्टरला अटक झाली. त्यानंतर विविध ठिकाणी छापे टाकून सुरक्षा यंत्रणांनी ४० जणांना अटक केली. आम्ही सर्व राजकीय पक्षाचे नेते कोणत्याही विचाराचे असोत, पण हा देश आणि महाराष्ट्र सुरक्षित राहीला पाहिजे. त्यासाठी कठोर कार्यवाही करावी, अशी आक्रमक मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली.

नागपूर येथे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुणे, मुंबईसह प्रमुख शहरातील देशविरोधी कारवायांबाबत चर्चा झाली. यामध्ये आमदार लांडगे यांनी आक्रमपणे भूमिका मांडली. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी सभागृहात ठाण्यात एनआयए आणि एटीएसने केलेल्या कारवाईबाबत मुद्दा उपस्थित केला. देशविरोधी कारवाईबाबत विशिष्ट समाजातील लोकांच्या घरी कोणतेही नोटीस न देता छापा मारण्यात आला. १५ लोकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही कल्पना नव्हती, अशी भूमिका मांडली.

हेही वाचा  –  लग्नसराईत सोन्याच्या दरात मोठी उलाढाल, जाणून घ्या आजचे सोने-चांदीचा दर काय? 

यावर, आमदार लांडगे यांनी अबू आझमी यांना जोरदार प्रत्त्यूत्तर दिले. आमदार लांडगे म्हणाले की, समाजवादी पक्षाचे पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित केला. पण, पुण्यामध्ये अतिरेकी कारवाया सुरू झाल्या आहेत. ‘एनआयए’ आणि ‘एटीएस’ने दि. १८ जुलै २०२३ रोजी पुण्यात करवाई केली. कोंढवा परिसरातील एका मस्जिदमध्ये एक भूलतज्ञ डॉक्टर पकडण्यात आला. त्यानंतर महिनाभराने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह येणार होते. त्यानंतरच्या काळात ४ आतंकवादी पकडल्याचे समोर आले. आम्ही कोणत्याही पक्षाचे असो…विचाराचे असो… पण, हा देश आणि महाराष्ट्र सुरक्षित राहिला पाहिजे, असे आमची भावना आहे.

मुंबई, पुणे सह प्रमुख शहरांतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एनआयए आणि एटीएस कारवाई करीत असेल, ४० लोकांना ताब्यात घेत असेल, तर आपल्या अधिकाऱ्यांचे कौतूक करायला हवे. मात्र, आमदार अबू आझमी त्या कारवाईवर आक्षेप घेत होते. पुण्यात मशिदीत छापा टाकण्यात आला. त्याठिकाणी देशविरोधी कृत्य करणारा डॉक्टर सापडला. केवळ मुंबई नव्हे, तर चार ठिकाणी कारवाई झाली आहे. त्यामुळे कारवाईवर आक्षेप घेण्यापेक्षा देश आणि महाराष्ट्र सुरक्षित राहिला पाहिजे, अशी माझी भूमिका आहे.

महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button